स्थिर व मजबूत भारत चीन संबंध  गरजेचे -शी जिनपिंग

वेबटीम –   दोन देशांच्या संरक्षण आणि सुरक्षा कर्मचा-यांमध्ये संवादाची आवश्यकता आहे असे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केले. डॉकलालमध्ये सुरू असलेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनमधील झियामेन येथील 9 व्या ब्रिक्स परिषदेच्या वेळी चर्चा केली. डॉक्लम प्रकरणानंतर  भारत आणि चीन या दोन देशांच्या नेत्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती .

भारत व चीन संबंध या बाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी चांगली चर्चा झाली आहे. ब्रिस्क परिषदेमुळे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.ही चर्चा अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.