शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

टीम महाराष्ट्र देशा : शेंगदाण्यातील काही तत्वे पोटदुखी वरील समस्यांवर रामबाण उपायाचे काम करते. पचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते. शेंगदाणे नियमित खाल्ल्याने शरीरातील रक्ताची समस्या दूर होते. तसेच शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जाते.

हे गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. यामधे पोटेशियम, मैग्नीज, कॉपर, केल्सियम, आयरन, सेलेनियम गुणांनी भरपूर असलेले शेंगदाणे भिजवून खाल्ल्याने एसिडीटी च्या समस्या दूर होतात. शेंगदाणे वाफवल्यास त्याचे गुणधर्म वाढतात तर भाजलेले शेंगदाणे पचण्यास हलके असतात. अशाप्रकारे आपण आपल्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करू शकतो.

जीवनसत्व बी ३चा स्त्रोत असलेले शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज मुठभर शेंगदाणे खाण्यास काही हरकत नाही. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत. शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. शेंगदाण्याच्या सेवनाने शारीरिक ताकद व कार्यशक्ती वाढून वृद्धत्व दूर राखण्यास मदत होते. शेंगदाणे भाजल्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते.

तसेच शेंगदाण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. अतिप्रमाणात शेंगदाण्याचं सेवन केल्यास ते शरिरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या