Share

Health Tips | Overeating ची सवय आहे धोकादायक, जाणून घ्या!

टीम महाराष्ट्र देशा: समोर आवडीचा पदार्थ आला किंवा चविष्ट पदार्थ आला तर आपण विचार न करता सरळ त्यावर तुटून पडतो. एखादा पदार्थ लिमिटमध्ये खाल्ल्याने काही फरक पडत नाही पण जर तुम्ही ओव्हरइटिंग (Overeating) करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. कारण अति खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे आरोग्य बिघडते. ओव्हर इटींग किंवा जास्त खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. आणि त्यामुळे आपल्याला हृदयरोगाशी झुंज द्यावी लागू शकते. अति खाल्ल्याने शरीरात आपण स्वतः रोगांना आमंत्रण देतो.

Overeating ने ह्रदयरोग वाढतात

नॉर्थ वेस्टर्न मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, हेवी खाणे आणि अति खाणे सरळ तुमच्या हृदयावर परिणाम करते. कारण जास्त खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाचे आजार निर्माण होतात. आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते. जर तुम्ही ह्रदयरोगाचे रुग्ण असाल तर तुम्ही मर्यादित प्रमाणातच खायला पाहिजे. अन्यथा तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात.

लठ्ठपणाशी द्यावी लागू शकते झुंज

अति खाल्ल्याने आपल्याला प्रामुख्याने लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. जास्त वजन वाढल्यामुळे आपल्याला शुगर आणि बीपी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दोन्ही समस्या पुढे हृदयविकाराचे कारण बनू शकते.

Overeating कसे टाळावे ?

  • अति खाणे टाळण्यासाठी शरीराला पुरेसे पाणी द्या. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा.
  • जर तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, तुम्ही थोडा थोडा वेळाने खाऊ शकतात.
  • भूक लागल्याशिवाय खाणे टाळा. कारण बराच वेळा करायला काही नाही म्हणून आपण खात बसतो. आणि ते शरीरासाठी घातक ठरू शकते.
  • खाण्यामध्ये कमीत कमी सोडियम असलेले पदार्थ खा.
  • अति खाणे टाळण्यासाठी जेवण सोडू नका त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागते आणि शरीरावर त्याच्या वाईट परिणाम होतो.
  • अति खाणे टाळण्यासाठी तुमच्या जेवणाच्या वेळा ठरवून घ्या.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: समोर आवडीचा पदार्थ आला किंवा चविष्ट पदार्थ आला तर आपण विचार न करता सरळ त्यावर तुटून पडतो. …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now