Share

Health Tips | अतिप्रमाणात गरम पाणी पीत असाल तर ते आताच थांबवा, कारण आरोग्यासाठी ते हानिकारण

टीम महाराष्ट्र देशा: पाणी हा आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्यास शरीर निरोगी राहते. त्वचा असो किंवा वजनावरील समस्या त्यावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे पाणी आहे. त्यामध्ये पण आपण गरम पाण्याचे सेवन करत असू, तर ते आरोग्यासाठी अतिउत्तम आहे. डॉक्टर ही बराच वेळा गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण अति गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

खरंतर गरम पाणी हे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर असते असे आपण ऐकत आलेलो आहोत. वजन कमी करण्यासाठी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी देखील आपण गरम पाणी पित असतो. पण अति प्रमाणात गरम पाण्याचे सेवन करून आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. गरम पाण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे सुद्धा आपल्या शरीराला होऊ शकतात.

गरम पाणी अति पिण्याचे परिणाम 

अति गरम पाणी पिल्याने आतड्यांसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात

गरम पाण्याचे अति सेवन केल्याने शरीराच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागतो. तुम्हाला आतड्यांसंबंधीच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आणि ते तुमच्या शरीराला घातक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हाला आतड्यांचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिण्याबाबत एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

गरम पाण्याचे अति सेवन केल्यामुळे झोप येण्यास त्रास होतो

चहा कॉफी पिल्याने झोप येत नाही असे आपण नेहमी ऐकत असतो. पण त्याचबरोबर झोपताना गरम पाणी पिल्याने ही झोप लागत नाही. तसेच झोपताना गरम पाणी प्यायल्याने लघवीला जास्त त्रास होऊ शकतो.

अतिगरम पाणी पिल्यामुळे नसांवर सूज येऊ शकते

तहान लागल्यावरच पाण्याचे सेवन करा असे सल्ला आपण नेहमी ऐकत असतो. तहान न  लागता गरम पाणी पिल्याने थेट मेंदूच्या नसावर परिणाम होऊ शकतो. आणि मेंदूच्या नसांवर सूज देखील येऊ शकते. त्यामुळे तहान लागल्यावरच गरम पाणी प्या. कारण अति गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे डोकेदुखीचा त्रासही निर्माण होऊ शकतो.

अति गरम पाणी पिणे करू शकते किडनीवर परिणाम

गरम पाण्याचे सेवन केल्यावर किडनीवर जास्त ताण पडतो. त्यामुळे किडनी निकामी होऊन तिच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे खूप गरम पाणी पिणे टाळावे.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: पाणी हा आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्यास शरीर निरोगी राहते. त्वचा असो …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now