टीम महाराष्ट्र देशा: आजकाल जास्त बैठकीमुळे किंवा धावपाळीमुळे लिगामेंट इंजुरी च्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. अति चालणे अति बसणे किंवा शरीराला पोषक आहार न मिळणे यामुळे या समस्या निर्माण होऊ लागतात. लिगामेंट इंजुरी झाल्यावर आपल्याला प्रचंड वेदना होतात आणि चालताना देखील त्याचा त्रास होतो. खेळाडूंमध्ये लिगामेंट इंजुरीचे प्रमाण जास्त आहे. जर तुमची लिगामेंट इंजुरी किरकोळ असेल तर तुम्ही घरगुती उपचार आणि व्यायामाद्वारे ती बरी शकतात. पण गंभीर असेल तर त्यासाठी नक्कीच डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.
लिगामेंट इंजुरी साठी सोपे घरगुती उपाय
बर्फ
लिगामेंट इंजुरी झाल्यावर त्यावर सूज येऊन त्या जागेवर वेदना होऊ लागतात. अशावेळी तुम्ही तिथे बर्फ लावू शकतात. लिगामेंट इंजुरी झाल्यावर 2 ते 3 दिवस दररोज 15 मिनिटे बर्फ लावल्याने सूज कमी होऊन वेदना कमी होऊ लागतात.
आल/आद्रक
लिगामेंट इंजुरी झाल्यावर जास्तीत जास्त आल्याचा वापर करा. कारण आल्या मध्ये वेदना आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म आढळतात. 1 लिटर पाण्यात अर्धा चमचा ग्रीन टी, अर्धा लिंबू आणि थोडे मध घालून थोडे आले घाला व ते चांगले उकळून घ्या. हा तयार झालेला काढा दिवसातून दोनदा प्या. तुम्हाला आराम मिळेल.
एरंडेल तेल
लिगामेंट इंजुरी वर एरंडेल तेल हे खूप फायदेशीर आहे. एरंडेल तेल लावल्याने वेदना आणि सूज या दोन्ही गोष्टी पासून तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या लिगामेंट इंजुरी वर हलक्या हाताने एरंडेल तेलाने मसाज करा आणि त्यावर कापड बांधा. एक-दोन दिवस असे केल्याने तुम्हाला आराम मिळू लागेल.
लिगामेंट इंजुरीवर पट्टी बांधा
लिगामेंट इंजुरी झाली असल्यास चालल्याने किंवा हालचाल केल्याने दुखपतीवरील वेदनेत वाढ होते. अशा परिस्थितीत सूज अधिक वाढू शकते. इंजुरी झालेल्या जागेवर तुम्ही पट्टी बांधू शकतात त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि तुमच्या लिगामेंट इंजुरी वरील सूज देखील लवकर कमी होईल.
व्यायाम
लिगामेंट इंजुरी झाल्यावर तुम्ही हलके व्यायाम करू शकतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून तुमच्या स्नायूंना आराम मिळेल आणि त्याचबरोबर वेदनाही कमी होतील.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Explained | उद्धव ठाकरेंशिवाय शिंदे गटातील मंत्र्यांचे राजकीय भविष्य धोक्यात? पुढे निवडून येणेही अवघड
- Ajit Pawar | “काही जणांची भाषणं…”; शिंदेंच्या भाषणावर अजित पवार यांचा खोचक टोला
- MNS | एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या संपत्तीबाबत उद्धव ठाकरेंवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर मनसेची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Farming Update | पॉलिहाऊस मध्ये भाज्यांसोबत होऊ शकते मधाची शेती, कशी? ते जाणून घ्या
- Rohit Pawar | “जनता सोबत असली तर किल्ला अभेद्य राहतो”; रोहित पवार यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत