टीम महाराष्ट्र देशा: डेंग्यू ताप आल्यास, किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यास डॉक्टर आपल्याला फळं खाण्याचा सल्ला देतात. कारण फळं किंवा फळांच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढते. डॉक्टर प्रामुख्याने किवी किंवा किवीचा रस सेवन करण्याचे सल्ले देतात. कारण किवीच्या सेवनाने रक्तातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते आणि इतर अनेकही आजार दूर होतात. आम्ही आज तुम्हाला किवी ज्यूसचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत.
किवी ज्यूसचे फायदे
किवी मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असते. त्याचबरोबर किवीमध्ये कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, पोटॅशियम, विटामिन सी, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे किवी किंवा किवीच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात.
किवी ज्यूसचे सेवन हृदयरोगांपासून दूर ठेवू शकते
दररोज आपल्या आहारात किवीच्या ज्यूस समावेश केल्याने तुमचे ह्रदयाचे आरोग्य सुधारू शकते. कारण किवी मध्ये आढळणारे पोटॅशियम हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित आजारांपासून आपल्याला सुरक्षित ठेवते. त्यामुळे जर हृदय निरोगी ठेवायचे असेल तर दररोज एक ग्लास किवीच्या ज्यूस सेवन केले पाहिजे.
किवी ज्युस पिल्याने पेशी सुरक्षित राहतात
दररोज एक ग्लास किवी ज्यूसचे सेवन डेट सेल्स सुधारू शकतात. किवी मध्ये आढळणारे अँटीअँक्सीडेंट गुण पेशींसाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर किवी मध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स पेशींसाठी खूप फायदेशीर आहे.
किवी ज्यूस रोज पिल्याने केस आणि त्वचा निरोगी राहू शकते
किवी मध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे दररोज किवीच्या ज्यूस पिल्याने तुमची त्वचा आणि केस निरोगी राहू शकतात. किवी ज्यूस चे सेवन तुमची त्वचा फ्रेश आणि तरुण बनवण्यास मदत करते.
पाचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज 1 ग्लास की ज्यूस घेतला पाहिजे
विटामिन सी चा खजिना असलेले किवी तुमची पचन प्रक्रिया सुधारू शकते. किवी आपल्या शरीरासाठी प्रोबायोटिक म्हणून काम करते. त्यामुळे किवी पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो.
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका