fbpx

जाणून घ्या महिलांच्या आरोग्यासाठी खास आरोग्य सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : आजकाल बऱ्याच महिलांना थायरॉईडची समस्या असते. थायरॉईडचा त्रास असल्यास गव्हांकूर चिकित्सा फायदेशीर ठरू शकतो. त्याच बरोबर रोज सकाळी गळ्याला ताण देणारे व्यायाम आणि आसन केल्याने थायरॉईड ग्रंथी नियंत्रनित राहण्यास मदत होते.

महिलांना अनेक जबाबदारी पार पडायच्या असतात. त्या पार पडताना बऱ्याच वेळा अशक्तपणा, मानसिक थकवा याला सामोरे जावे लागते. अशा वेळी आपण आपल्या आहारामध्ये तूप, बाजरी, केळी, शेवगा, अंजीर, मेथी, नारळाचं पाणी या पदार्थांचा समावेश करावा. ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे. त्यांनी आपल्या आहारामध्ये पित्तशामक पदार्थांचा समावेश करावा.

यामुळे शरीरातील पत्त कमी होण्यास मदत होते. आणि यामुळे शरीराला आणि डोक्याला थंडावा मिळतो. आपण आपल्या आहारामध्ये धने डाळ, बडीशेप, खडीसाखर या गोष्टींचा समावेश करू शकतो. रोज सकाळी जिलेबी खाल्याने सुद्धा डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. जर गर्भ राहत नसेल तर किंवा गर्भपात होत असेल तर किंवा गर्भाचे कोणते विकार होत असतील तर जांभळाचा काढा यावर खूपच उपयुक्त ठरतो.

जांभळाचा काढा मधाबरोबर किंवा ताकाबरोबर नियमित घेतल्याने फायदा होतो. हे एक उत्तम औषध समजले जाते. जर वारंवार गर्भपात होत असेल तर उंबराची फळ खावी. उंबराच्या झाडाच्या सालीचा काढा घेतल्यास देखील फायदा होऊ शकतो. यामुळे गर्भपात होणार नाही. गर्भाची वाढ चांगली होईल.

महत्वाच्या बातम्या