डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं अधिसूचना केली जारी

टीम महाराष्ट्र देशा- सर्व राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे. रुग्णालयांमधे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी करण्यासह जागतिक स्तरावर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं गुणोत्तराचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ही पदं भरण्यात येणार आहेत.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री अश्विनिकुमार चौबे यांनी ही माहिती दिली. दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय आणि निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वित्तीय प्रोत्साहन देण्याची तरतूद करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या असल्याचंही चौबे यावेळी म्हणाले. रुग्णालयात डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजनेच्या निर्देशाबरोबरच एकसमान कायदा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.