‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

rajesh tope

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता एका वृत्तवाहिनेने व्हायरल ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केल्याने खळबळ माजली आहे.

वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले जात असल्याचे ऐकायला मिळाले आहे. तर समोरचा व्यक्ती क्लास डी साठी 6, क्लास बी साठी 13 लाख रुपये रेट असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काम शंभर टक्के होणार, अशी एजंटकडून लोकांना बतावणी करण्यात येत आहे.

यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. ‘सदर ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, तसेच आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे.’ असे स्पष्टीकरण टोपे यांनी दिले आहे.

दरम्यान आता या परीक्षांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज दुपारी 2 ते 3 तास याबाबत बैठक झाली होती व त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या