शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा

मुंबई – विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीकरिता शिवसेनेने स्थानीय लोकाधिकार समितीचे विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची संधी हुकल्याने त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय.

आरोग्यमंत्री म्हणून दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबद्दल बरीच टीका झाली होती. शिवसेनेच्या आमदारांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंत यांच्याविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. उद्धव ठाकरे देखील त्यांच्यावर नाराज होते. दरम्यान याचा परिणाम म्हणून शिवसेनेने दीपक सावंत यांना डावलून विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान आता राजीनामा दिल्यानंतर दीपक सावंत काय भूमिका घेणार हे पहान महत्वाचं ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...