fbpx

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा,मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरु

sawant-deepak

मुंबई – शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा कालावधी आज संपणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी ४ जूनलाच आपला राजीनामा  दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता.

विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करावा लागला आहे. सावंत यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८रोजी संपली होती.

दरम्यान,’माझ्या राजीनाम्याशी नाराजीचा काहीएक संबंध नसून विधान परिषदेचं सदस्यत्व संपल्यानं मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, मात्र मला नव्या जबाबदारीची अपेक्षा आहे’, अशी अपेक्षा डॉ. सावंत यांनी व्यक्त केली आहे.सावंत यांच्या जागी संधी मिळावी, यासाठी सध्या शिवसेना नेत्यांकडून जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे.