मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्स आणि आरोग्य खात्याची बैठक पार पडली. यावेळी कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी घेतला. तसेच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित यंत्रणांना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope) यांचीही उपस्थिती होती. राजेश टोपे यांनी सांगितले की आरोग्य विभागाने कोरोनाला आळा घालण्यासाठी ऑग्युमेटेंड रिस्ट्रिक्शनविषयीचा पर्याय सुचविला आहे. म्हणजेच आता आपल्याला अनावश्यक सेवा किंवा गोष्टी बंद करण्याचा विचार करावा लागेल. ज्या गोष्टींमुळे दैनंदिन जीवनात काही अडणार नाही, अशा अनावश्यक गोष्टी बंद करण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. बैठकीतील सगळे निष्कर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. बैठकीनंतर ते माध्यमाशी संवाद साधत होते.
पुणे जिल्ह्यातील ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. @AjitPawarSpeaks दादा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी @Dwalsepatil,@bharanemamaNCP व पदाधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/atXQgkKPMe— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2022
दरम्यान राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच राज्यातील ७० आमदार आणि तब्बल १० ते १५ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
अजित पवारांनी संबंधित यंत्रणांना दिल्या ‘या’ सूचना-
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे,ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी. सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत.तसेच उपचारासाठी अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, याची दक्षता घ्यावी. तसंच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. आरोग्य यंत्रणेनं सज्ज रहावं, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयानं काम करावं. अशा सूचना अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
- “अमाप माया सोबत घेऊनी, माय चालली अनाथ करुनी!”, सदाभाऊंची भावनिक पोस्ट
- “धनंजय मुंडेंचा आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ, हे सरकार नाही तमाशाचा फड”
- ‘खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<