आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी होणार परीक्षा

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी होणार परीक्षा

rajesh tope

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान आता या परीक्षांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज दुपारी 2 ते 3 तास याबाबत बैठक झाली होती व त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

यावेळी टोपे बोलताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा. तसेच या परीक्षेसाठीचे हॉलतिकीट 9 दिवस आधी दिले जाईल, अशी देखील माहिती टोपे यांनी यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या