टीम महाराष्ट्र देशा: भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, देशात 77 दशलक्षाहून अधिक लोक डायबिटीज ने ग्रस्त आहेत आणि 2045 पर्यंत ही संख्या 134 दशलक्षांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. डायबिटीज हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या डायबिटीजच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने डायबिटीज कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. आयुर्वेदात अशा अनेक चिकित्सा आहेत ज्याद्वारे कुठलीही महागडी यंत्र न वापरता किंवा ऑपरेशन न करता यावर इलाज करता येतो.
रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबेटीस होतो. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबेटीसवरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र शरीरातील इंसुलिनचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे डायबेटीस होते. आयुर्वेदात अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, ज्याचा वापर करून रुग्णाची पचन प्रक्रिया दुरुस्त केली जाते. आयुर्वेदिक औषध पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते रोगावर नाही तर रोगाची कारणे दूर करण्याचे काम करते. त्यामुळे रोग मुळापासून दूर होतो आणि रुग्णाला वारंवार औषधे घ्यावी लागत नाहीत. आयुर्वेदात मनुष्यांच्या तीन प्रकृती मानल्या जातात – कफ, पित्त आणि वात. या प्रकारांनुसार डायबेटीसचे वात प्रमेह, पित्त प्रमेह आणि कफ प्रमेह असे प्रकार करून त्यांवर योग्य ते उपचार केले जातात.
या कारणांमुळे होते डायबिटीज
• योग्य आहाराचा अभाव
• अनियमित जीवनशैली, अर्थात अयोग्य झोपणे-जागणे, खाणे-पिणे
• शारीरिक व्यायाम न करणे
• त्याचबरोबर डायबिटीज अनुवंशिक कारणांमुळेही होते.
पुढील औषधी वापरुन आयुर्वेदात डायबिटीजवर उपचार केले जातात
• आवळा
• त्रिफळा
• गुडमार
• दालचीनी
• मेथी
• कतकखदिरादि कषाय
• निशा कतकादिकषाय
• करावेल्लका
त्याचबरोबर नियमित तसेच सकस आहार, शारीरिक व्यायाम आणि तंदुरुस्ती, वेळेत झोप, इत्यादि गोष्टींमुळे मधुमेहाचा धोका टाळता येतो.
महत्वाच्या बातम्या
- Viral Video | मिश्किलपणे खाऊ खाताना दिसली ‘ही’ खारुताई, पाहा व्हिडिओ
- Asaduddin Owaisi | हिजाब नाही मग बिकिनी घालायची का?; हिजाबवाली महिला PM म्हणून बघायचीय…
- Jayant Patil । “ठाकरेंकडून सत्ता-धनुष्यबाण हिसकावून घेतलं, महाराष्ट्राच्या जनतेला पसंत नाही, उत्तर मिळणारच!”
- Travel Tips | आता करा मोफत फॉरेन ट्रीप, कारण ‘हा’ देश देणार आहे मोफत विमान तिकीट
- Facebook Instant Article | एप्रिल २०२३ ला फेसबुक इस्टंट आर्टिकल बंद होणार