तुम्हाला हेडफोन वापरण्याची सवय आहे का ? असेल तर मग सावधान

संदीप कापडे : युवकांपासून लहानमुले ते वृद्धांपर्यत सध्या सर्वांनाच हेडफोन वापरण्याच चांगलेच क्रेज आहे. कॉलेजमध्ये , बस किंवा मोबाईलवरून बोलण्यासाठी जास्तीत जास्त हेडफोनचा वापर होतो आहे .  काही युवकांना तर हेडफोनशिवाय करमतच नाही. मात्र , क्षणभर आनंद देणारे हे हेडफोन आपल्या आरोग्याला हानिकारक ठरत आहेत. सर्वाधिक डेसीबल साउंडमुळे  तसेच जास्त वेळ हेडफोन लावल्यास बहिरेपणा येऊ शकतो.

आपण ऐकत असलेल्या गाण्याचा आवाज 90 डेसीबलच्या वर गेल्यास कानाला इजा  होऊ शकते. त्यामुळे मध्यम स्तरावर आवाज ठेऊन गाणे ऐकावे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे हेडफोन आले आहेत.  त्याचा वापर आपण कानाच्या खूप जवळ करतो. त्यामुळे गाणे ऐकण्याचा सुंदर अनुभव तर मिळतो. पण हेडफोनचा वापर जास्त वेळ केल्यामुळे कानामध्ये हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे आपण नेहमीसाठी ऐकण्याची शक्ति गमावू शकतो. तसेच मेंदूवर पण हेडफोनचा वाईट परिणाम होतो. हेडफोन मधून निघणारे विद्युत चुम्बकीय तरंगामुळे मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकते.

सध्या कॉलेज तरुण इतर मित्रांचे अनुकरण करतात. त्यामुळे स्वतच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. जास्त हेडफोन वापरामुळे बहिरेपणा येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी फक्त गरजेपुरते हेडफोन वापरावे. हेडफोनचा अनावश्यक वापर टाळावा. संशोधन सांगते की हेडफोन मधून निघणाऱ्या रेझमुळे केन्सर सुद्धा होऊ शकतो. – डॉ सलगर, ससून हॉस्पिटल पुणे.