करमाळा : ‘सैराट’ मुख्याध्यापकानेच मुलीला पळवलं

करमाळा : सैराट या सिनेमामुळे चर्चेत आलेला करमाळा तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करमाळा तालुक्यातील बोरगाव येथे चालणाऱ्या एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील मुलीला फूस लावून पळवून नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

या मुख्याध्यापकाच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दोघांनाही सध्या शोधत असून अजून या शिक्षक आणि विद्यार्थिनीचा कोणताही तपास लागलेला नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच शाळेतील शिपायाने देखील एका मुलीला पळवून नेण्याची घटना घडल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यामुळे ही शाळा बंद करावी, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर संतप्त आता ग्रामस्थांनी या शाळेसमोर आंदोलन सुरु केलं आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या प्रचंड रोष पहायला मिळत असून सध्या शाळेला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

करमाळ्यात सरकार विरोधी तिरडी आंदोलन

पुणे :रस्त्यावर स्टेज टाकून, साउंड लावून मुली नाचवणाऱ्या मोबाईल कंपन्यांना मनसेचा दणका