विद्यार्थांच्या पट संख्येवर ठरणार मुख्याध्यापकांचे पद

अतिरिक्त ठरणाऱ्या मुख्याध्यापकांचा पदभार कमी होणार आहे.

वेब टीम : मुख्याध्यापकांचे पद आता पट संख्येवर अवलंबून असणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्राथमिक ते उच्च प्राथमिक शाळांसाठी मुख्याध्यापकांच्या पदाचे निकष आता विद्यार्थी संख्येनिहाय करण्याचे ठरले असून अतिरिक्त ठरणाऱ्या मुख्याध्यापकांचा पदभार कमी होणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांचे समायोजन, वर्गतुकडय़ा, मुख्याध्यापकांची पदे, नव्या शाळा, वर्ग जोडणे आदीबाबत प्रथमच काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वीस मुलांपर्यंत पटसंख्या असणाऱ्या शाळांबाबत प्रथमच केलेले बदल या शाळांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. शिक्षण सचिवांनी सादर केलेल्या अहवालानंतर हे बदल करण्यात आले. बदल करतांना नागरिक, विविध संघटना, संस्था यांच्याही मतांची नोंद घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

bagdure

प्राथमिक शाळेत दीडशेवर पटसंख्या असेल तरच मुख्याध्यापक पद मान्य होणार असून सध्या अस्तित्वात असणाऱ्या शाळांत पटसंख्या १३५ पेक्षा कमी असल्यास पद रद्द होईल. तसेच उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतही शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी अपेक्षित आहेत. हा निर्णय अंमलात येण्यापूर्वीच्या निकषानुसार मान्य झालेले मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्याच व्यवस्थापनाच्या अन्य शाळेत समायोजित करावे लागेल. पूर्ण जिल्हय़ातच मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना वेतन संरक्षण देऊन शिक्षकांच्या रिक्त जागेवर नियुक्ती मिळेल. मात्र पद गमावलेल्या मुख्याध्यापकांना पुढील काळात पद रिक्त झाल्यास प्राधान्य मिळण्याची सोय करण्यात आली आहे.

प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी मिळून साठपर्यंत पटसंख्या असल्यास दोन शिक्षक राहतील आणि ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मिळेल. उच्च प्राथमिक शाळेत ३५ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक मिळतील. तसेच पूर्वीच्या निर्णयानुसार प्राथमिक शाळांना पाचवीचा तर उच्च प्राथमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडण्याची कार्यवाही झालेली आहे.

You might also like
Comments
Loading...