छत्रपतींना दुजाभाव कोण दाखवत असेल तर खपवून घेणार नाही – अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांना दुजाभाव दाखवण्याचा धंदा कोणी करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच खरे काय आहे हे सरकारने स्पष्ट करायला हवे अशी मागणी अजित पवार यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उंची सरकार कमी करत आहे. छत्रपतींचा पुतळा एक इंचही कमी होवू देणार नाही असा इशारा अजितदादा पवार यांनी सरकारला दिला. पुतळ्याची उंची १६० मीटरवरुन १२६ वर आणली आहे. सरकारने असे करण्याचे कारण काय ? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची ही सर्वात मोठी रहावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जात असल्याचे म्हटले जात आहे हे खरे आहे का? असा प्रश्न अजितदादांनी सरकारला केला आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत आम्हाला आदर आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सर्वात मोठा होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. शिवाय सरकारकडून वारंवार या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले गेले होते मग असे का घडत आहे ? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.