पवारांना कधीच पंतप्रधान पद मिळाले नसल्याची वेदना त्यांच्या मनात: फडणवीस

fadnis pawar

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री वाटतं असल्याचे म्हंटले होते. या वक्तव्याला “मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात राहत नाही त्यांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, मी त्यांचं अभिनंदन करतो”, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला होता. यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल आहे.

फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार खूप मोठे नेते आहेत मोठ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची नसतात पवार साहेब चार वेळेस मुख्यमंत्री झाले पण त्यांना कधीच पंतप्रधान पद मिळाले नाही याची वेदना त्यांच्या मनात असेल ‘असे आपण म्हणू शकतो. या शब्दात त्यांनी पवारांवर बोचरी टीका केली आहे.

तर पुढे फडणवीसांनी पक्षाच्या कामगिरीबाबत भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, राज्यात आम्हाला सत्ता मिळाली नाही ही गोष्ट खरी असली तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. गेली दोन वर्ष आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो आहोत. कोरोना काळात आम्ही जनतेची सेवा केली घरात बसून राहिलो नाही असे फडणवीस उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या