तो नेहमी गद्दारचं राहणार आहे; स्टीव्ह स्मिथवर भरडकले भारतीय चाहते

amith

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनीमध्ये टेस्टचा पाचवा दिवस ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्या नावे राहीला. पण स्टीव स्मिथ आपल्या कृत्यामुळे ट्वीटरवर ट्रेंड करु लागलाय. मॅचच्या चौथ्या डावादरम्यान ड्रिंक्स ब्रेक झाल्यावर ऋषभ पंत पीच सोडून पाणी पिण्यासाठी गेला. यावेळी संधीचा फायदा घेत स्टीव स्मिथ पीचला नुकसान पोहोचवण्याचे काम केले. ऑस्ट्रेलिया टीम विकेट घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे या प्रसंगातून दिसले. आपल्या बॉलर्सना मदत करण्यासाठी स्मिथने हे टोकाचं पाऊल उचलंल. स्टीव्ह स्मिथचा हा कारनामा स्टम्पला असलेल्या कॅमेरामध्ये कैद झाला.

ऑस्ट्रेलियन मीडियाने हा प्रकार लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण यावेळी टीव्हीवर फुटेज दिसू लागले होते. यात स्मिथचा पिचला नुकसान पोहोचवण्याचा गुन्हा स्पष्ट दिसतोय. दरम्यान पिचवर परत आलेल्या पंतने आपल्या बॅटने पुन्हा तो भाग समतोल केला. स्टीव्ह स्मिथचे कृत्य आयसीसीची आचारसंहिता अनुच्छेद 2.10 चे उल्लंघन आहे. अनुचित खेळामध्ये हा प्रकार मोजला जातो. जाणिवपूर्वक पिचला नुकसान पोहोचवणाऱ्या खेळाडूस 1 किंवा लेव्हल 2 चा अपराध मानला जातो. यासाठी स्मिथवर मोठी कारवाई केली जाऊ शकते.

याआधी देखील केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसले होते. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड केल्याचे मान्य केले होते. आयसीसीच्या या ट्विटनंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी स्मिथला जोरदार ट्रोल केले आहे. ‘धावा करायला सुरुवात तर केलीच सोबत चिटींगचीही सुरुवात केली आहे’, असे काही रसिकांनी म्हटले आहे. तर काहींनी ‘चेंडू छेडछाड प्रकरणानंतरही सुधारणा झाल्या नाहीत. तो नेहमी गद्दारचं राहणार आहे’, अशी टिका केली आहे.

महत्वाच्या बातम्या