तो आरसीबीचेही कर्णधारपद सोडेल : हर्षा भोगले

bhogale

नवी दिल्ली : विराट कोहली आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे टी २०चे कर्णधारपद सोडण्याचं निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे. त्याने घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांचं धक्का बसला आहे. याबाबत चर्चा काही दिवसापासून सुरु होती. आता मात्र त्याला अधिकृत केले गेले आहे. विराटने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे.

विराटच्या या घोषणेनंतर वेगवेळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी त्याच्या रोहितला कर्णधारपद सोपवणाच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. तर काहींनी थेट बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. त्याच्या या घोषणेनंतर समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करत तो आरसीबीचे नेतृत्व सोडेल असे वाटतं होते असे सांगितले आहे. त्यांनी लिहले ‘विराटची खेळाप्रती खूप निष्ठा आहे. मला वाटले तो आरसीबीचे कर्णधारपद सोडेल ज्यामुळे त्याला दोन महिने नेतृत्वातून सुट्टी मिळेल. मला अशी अशा आहे की हा निर्णय त्याचासाठी चांगला ठरेल. त्याला जो अराम पाहिजे तो मिळेल. आणि कोणास ठाऊक त्याचा बॅटला पुन्हा सूर गवसेल’.

विराट २०१७ पासून भारतीय संघाचे तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवत आहे. मानसिक दृष्ट्या आता त्याला आराम हवा आहे. यासाठी टी ट्वेंटीचे कर्णधारपद सोडणार आहे यात सांगितले आहे. या पत्रात त्याने प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्माचेही आभार मानले आहे.

महत्त्वाच्या बातम्या