‘तो’ आमच्या नजरेत होता पण दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती’- एटीएस

vinit agrawal

मुंबई : पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच अटक केले आहे. तसेच या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे. तसेच यांपैकी एका दहशतवाद्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव असून त्याचे पूर्वीचे दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात एटीएस प्रमुख विनित अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ते म्हणाले की,’काल तुम्ही दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद बघितली. दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक हा मुंबईच्या धारावीतला असून जान मोहम्मद अली मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. त्याचे पाकिस्तानातील डी कंपनीसोबत संबंध असल्याबद्दलचे अनेक रेकॉर्ड आहेत. जवळपास वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’आमच्या नजरेत तो होताच. पण दहशतवादी कटाबाबतची माहिती आमच्याकडे नव्हती. ती सेंट्रल एजन्सीकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती दिल्ली पोलिसांना दिली गेली होती.’ तसेच दिल्ली पोलिसांकडे असणारी माहिती घेऊन आम्ही येणार आहोत आणि आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही दिल्ली पोलिसांना देऊ. त्यानंतर ही केस पुढे कशी जातेय ते बघू’ असेही अग्रवाल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या