‘त्याला पॉर्न इंडस्ट्रीवर ‘राज’ करायचयं’; ट्विट करत केआरकेने लगावला टोला

केआरके

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर बॉलीवूड विश्वात एकच खळबळ उडाली. अनेक बॉलीवूड कलाकारांनी याप्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यातच अभिनेता कमाल आर. खान याने देखील पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत राज कुंद्राला टोला लगावला आहे.

Bollywood news kamaal rashid khan made two tweets against raj kundra then delete it राज कुंद्रा के खिलाफ KRK ने किए दो ट्वीट, फिर किए डिलीट; जानें क्या लिखा था? - lifeberrys.com

केआरकेने त्याच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहिलं की, ‘मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीमधला मोठा राजा बनण्यासाठी प्लॅनिंग करत होता. जगभरात पोर्नचं लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याच्या तयारीत होता. वाह, काय प्लॅन होता, कुंद्रा भावाची जय हो, शिल्पा वहिनीची जय हो…’.केआरकेचं हे ट्विट काही मिनीटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण त्यानंतर काही तासाभरातच केआरकेनं हे ट्विट ताबडतोब डिलीट सुद्धा केलं.

फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP