fbpx

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या आवळल्या

टीम महाराष्ट्र देशा- अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला तब्बल 15 वर्षांनंतर पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रवी पुजारीविरोधात भारतात खंडणी, अपहरण आणि खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

डॉन रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक केल्याचे वृत्त आहे. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. २२ जानेवारीला त्याला अटक केल्यानंतर २६ जानेवारी या दिवशी भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली. अटकेनंतर पुजारी याला भारतात आणले जाईल असे समजते.

दरम्यान,याआधी बंगळूरु पोलिसांनी त्याच्याविरोधात ‘रेड कार्नर’ नोटीस जारी केली होती. काही दिवसांपूर्वी रवी पुजारी बुर्किनो फासोमध्ये असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती.