चीनमध्ये ‘तो पुन्हा आला’; रहिवाशांना शहरे न सोडण्याचे आवाहन

chin

नवी दिल्ली : मागील जवळपास २ वर्ष्यांपासून संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूला आता संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे. हा कोरोना विषाणू कुठून आला ? कसा निर्माण झाला? याबाबत अनेक दावे गेले अनेक दिवस केले जात होते. कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा देखील केला जात असल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा कहर काही अंशाने कमी झाला असल्याचे पहायला मिळाले होते. परंतु आता चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुतियान शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांना शहर न सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. करोनाचा उद्रेक पाहता सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

तसेच मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य वेळी पावलं उचलली नाहीत तर करोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या चार दिवसात ५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या फुजियान भागात १०२ रुग्ण आढळले आहेत. १ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय सुट्ट्या सुरु होत आहेत.

पर्यटनासाठी पर्यटक फुजियानला मोठ्या संख्येने येतात. मात्र करोना रुग्णांची संख्या पाहता यावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. त्याचा पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे. १२ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण ९५ हजार २४८ करोना रुग्ण आढळले. तर ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या