‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, मात्र चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात

टीम महाराष्ट्र देशा: बऱ्याच प्रतीक्षेनंतर ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.हा चित्रपट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असून यामध्ये बाळासाहेबांची मुख्य भूमिका नवाजुद्दीन सिद्दिक़ी निभावत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे, पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही सवांद आणि दृश्यांनवर आक्षेप घेतला आहे.

चित्रपटातील तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप असून या दृश्यांपैकीच एक बाबरी मस्जिदच्या दृश्यावरही आक्षेप घेतल्याची माहिती आहे. त्याबाबत खा. राउत म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना बॅॅन केल होत,तेंव्हा त्यांना कुणी रोखल आणि आताही कुणी रोखू शकणार नाही.

‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नवाजुद्दीन सिद्दिकी यांसह अनेक कलाकार आणि राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत.

हा चित्रपट अभिजित पानसे दिग्दर्शित असून या चित्रपटाचे निर्माते खा. संजय राउत हे आहेत.बाळासाहेबांची जयंती २३ जानेवारी आहे तर हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.