‘ओबीसींच्या राजकारणामुळेच शिवसेना सोडून शरद पवारांचा हात धरला’, भुजबळांनी सांगितले कारण

‘ओबीसींच्या राजकारणामुळेच शिवसेना सोडून शरद पवारांचा हात धरला’, भुजबळांनी सांगितले कारण

blank

नाशिक : दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांना नैराश्य आले आहे. त्यांना केवळ मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार होते पण स्वत: झाले. इतर नेत्यांना बाहेर का पडावे लागले? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंवर गंभीर केले.

याच पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, भुजबळ जर गेले नसते तर ते शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळेस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री झालो असतो.’

नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘ज्यावेळेस काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. त्यावेळेस शिवसेना-भाजप सरकारवर तुटून पडलो होती. माझ्या घरावर सुद्धा हल्ला झाला होता. माझ्यावर केस टाकल्या होत्या. माझ्या डोक्यावर प्रकरण थोपवण्याच्या त्यांचा कट होता. त्यावेळेस मी शिवसेना-भाजपसोबत लढत होतो. काँग्रेसचं विभाजन नव्हते झाले. तेव्हा मुख्यमंत्री कोण असे विचारलं असता शरद पवार म्हणाले, आणखीन कोण असणार भुजबळ मुख्यमंत्री असणार. नंतर काँग्रेसमधून शरद पवार बाहेर आले. त्यांच्यासोबत मी देखील बाहेर पडलो. पवार साहेबांसोबत राहिलो. अनेकांचे फोन आले पुढचा मुख्यमंत्री बनवतो. तसेच मी ओबीसींच्या राजकारणामुळे शिवसेना सोडली आणि पवार साहेबांचा हात धरला. त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गने आम्ही जातो आहोत. त्यामुळे ठिक आहे, जे मिळत त्यात मी खूश आहे.’

‘मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही. पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत ज्यांना कोणी विचारत नाही. परंतु लोकांचे मला भरपूर प्रेम मिळते. फडणवीस यांच्यात भ्रष्टाचार आरोप असलेला गुण हा उद्धव ठाकरे यांच्यात नाही. फडणवीस हे क्लीन चिट मास्टर आहेत. हा अवगुण आहे असे मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलू शकत नाही असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या