माझ्या आणि अनुराग बद्दल त्याला सगळं माहिती होतं, मोठ्या क्रिकेटपटूच्या नावाने खळबळ

अनुराग

मुंबई : लैंगिक शोषण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी करण्यात आली. अभिनेत्री पायल घोष हिने काही दिवसांपूर्वी अनुरागवर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. पायलच्या तक्रारीवरून १ ऑक्टोबरला पोलिसांनी अनुराग कश्यपला चौकशीसाठी बोलवले होते.

अनुराग कश्यपने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत. अनुरागच्या वकिलांनी याबाबत पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते की, ऑगस्ट 2013 मध्ये त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी कश्यप श्रीलंकेत होते आणि त्यासंदर्भातील दस्ताऐवजांचा पुरावा त्यांनी दिला आहे.

दरम्यान  दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने आणखी एक नवा दावा केला आहे. अनुराग कश्यप आणि तिच्यातील वादाबद्दल क्रिकेटपटू इरफान पठाणला माहिती असल्याचं तिनं सांगितलं.

पायल घोषने आपल्या ट्विटमध्ये इरफान पठाणला टॅग केलं आहे. पायलने म्हटलंय की, ‘अनुराग कश्यपने माझ्यावर बलात्कार केल्याचं मी इरफान पठाणला सांगितलं नाही.

पण, अनुराग कश्यप आणि माझ्यातील वादाबद्दल इरफानला निश्चितच माहिती होतं. माझा चांगला मित्र असल्याचा इरफान दावा करायचा, पण अनुराग आणि माझ्याबद्दल सगळं काही माहीत असूनही तो या वेळी गप्प आहे.’ पण तो लवकरच या विषयावरती बोलेल असे देखील पायल घोषने ट्विट केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-