fbpx

पवार वैफल्यग्रस्त परिस्थितीत आहेत, ते पंतप्रधान होत असतील तर त्यांना शुभेच्छा : गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या वैफल्यग्रस्त परिस्थितीत आहेत. त्यांनी हवेचा रोख ओळखलाय. त्यामुळे ते विविध कारणं शोधत आहेत. असे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले. तसेच पवार पंतप्रधान होत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. असेही महाजन यांनी म्हंटले. येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागून आहे. तर दुसरीकडे राज्याची विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

याचदरम्यान, भाजपची मुंबईत दुष्काळाचा आढावा आणि निवडणूक या विषयावर बैठक झाली.बैठकी नंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत शरद पवारांनी पक्षाचे चार खासदार कसे निवडून येतील यावर काम केलं असतं तर बरं झालं असतं. परंतु त्यांनी हवेचा रोख ओळखला आहे. असे त्यांनी म्हंटले. याचबरोबर, पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, सध्या ते वैफल्यग्रस्त परिस्थितीत आहेत. त्यांनी हवेचा रोख ओळखलाय. त्यामुळे ते विविध कारणं शोधत आहेत. ते जर पंतप्रधान होत असतील आणि त्यांचे जास्त लोक निवडून येत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. असेही त्यांनी म्हंटले.