मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडले आहेत. या पाश्वर्भूमीवर फायर आजींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आजींनी एकनाथ शिंदे यांच्यावर महत्वाचं विधान केले आहे.
“एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक असतील तर ते परत येतील. तुम्ही काही काळजी करू नका. शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही काळजी घ्या. तो रिक्षावाला होता तो आमदार-खासदार झाला, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. बंड केलेल्या शिवसेनेच्या आमदारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ते कट्टर शिवसैनिक असले तर साहेबांकडे माघारी येतील. जे गेले ते गेले, ते शिवसैनिक नाहीत. तुम्ही राजीनामा देऊ नका”, असे फायर आजींनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत काल लाइव्हमध्ये दिले आहेत. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही. बैठक नाही फक्त आमदार भेटणार आहेत आणि त्यानंतर दोन आमदार शिंदे कडून आलेत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. १२ नंतर शिवालय किंवा वर्षावर होईल”.
महत्वाच्या बातम्या –