“आदित्य ठाकरे मूर्ख आहे” निलेश राणेंची खरमरीत टीका

वेबटीम : मुंबई मध्ये पावसाने हाहाकार केल्यानंतर आता मुंबई च्या पावसावरून राजकारण रंगण्यास सुरवात झाली आहे. निलेश राणे यांनी फेसबुक ला एक व्यंगचित्र शेअर केल आहे. यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे मुंबईतील खड्यावर संभाषण दाखवले आहे. या पोस्ट मध्ये निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून “यापेक्षा हा जास्त मूर्ख आहे.” असे लिहिले आहे.

याआधी मुंबईच्या खड्यावरून शिवसेनेला अनेकदा राणे बंधूंनी लक्ष केले आहे. आर जे मलिष्काच्या गाण्याने मुंबई महापालिकेची पोलखोल केल्यानंतर नितेश राणे यांनी आर जे मलिष्का ला पाठींबा दिला होता. आता नितेश राणे यांनी सुद्धा “शिवसेनेने मुंबईला पुन्हा बुडवून दाखवल” अस ट्विट करत शिवसेनेवर निशाना साधला आहे.

एकीकडे मुंबई पाण्यात बुडाली असताना दुसरीकडे मात्र यावरून जोरदार राजकारण सुरु झाले आहे.

You might also like
Comments
Loading...