‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईच्या टीमची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खराब झाली आहे. यंदाच्या मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या पहिल्या सामन्यात जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खाद्याला दुखापत झाल्याने आणखी मोठा धक्का बसला होता.

संकटांच्या वादळात सापडलेल्या मुंबई इंडियन्सला आणि या टीमच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी मंगळवारी धडकली आहे. मलिंगा पुढील दोन सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि श्रीलंका क्रिकेट मंडळ यांच्यात तसा करार झाल्याची माहिती मिळत आहे.