fbpx

आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण आरोग्यसेवा –  एकनाथ शिंदे

मुंबई : सर्वसामान्य जनतेला खासगी आरोग्यसेवा परवडण्याजोग्या नसतात. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता, औषधोपचार, वैद्यकीय तपासण्या, तसेच मानसिक आरोग्य, माता व बाल आरोग्य संबंधीच्या अत्यंत महत्वाच्या १३ प्रकारच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून त्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यात हेल्थ वेलनेस सेंटरच्या माध्यमातून 12 हजार आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. राज्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत असून त्या माध्यमातून झोपडपट्टीमधील नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे. काल ठाण्यात आपल्या दवाखान्याच्या 2 केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात 100 सेंटरसाठी मंजुरी मिळाल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली

मंत्री श्री. शिंदे म्हणाले, दुर्गम भागात उत्तम आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आशा वर्कर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री खोतकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट होणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

1 Comment

Click here to post a comment