अखेर ‘त्यांना’ सन्मानाने मिळाला मॉलमध्ये प्रवेश

sonali shinde and vandna chawan and phoenix mall

पुणे: तृतीयपंथी असणाऱ्या सोनाली दळवी यांना नगररोडवर असणाऱ्या फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती, हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर सर्वस्त्ररातून निषेध व्यक्त केला जात होता. अखेर आज सोनाली यांची माफी मागत मॉलकडून त्यांना सन्मानाने प्रवेश देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा वंदना चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाचे वास्तव सर्वप्रथम ‘महाराष्ट्र देशाने’ पुढे आणले होते.

Loading...

काय आहे प्रकरण ?

एमबीए फायनान्समध्ये उच्च शिक्षित असणाऱ्या तसेच ‘आशिर्वाद’ सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी या नगररोडवर असणाऱ्या फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेल्या, मात्र दरवाज्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी केवळ तृतीयपंथी आहे म्हणून त्यांना प्रवेश नाकारला. हाच व्हिडीओ तृतीयपंथी समूहासाठी काम करणारे शाम कोंनूर यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

या घटनेबद्दल बोलताना सोनाली दळवी म्हणाल्या होत्या की, मी आणि माझा मित्र फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडवा खरेदीसाठी गेलो होतो, त्यावेळी सिक्युरिटी तपासणीसाठी मी महिला सुरक्षा रक्षकाकडे गेले, मात्र त्यांनी माझी तपासणी करण्यास नकार दिला. तसेच दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला बोलावून घेतले. पण त्यांनी ‘आम्ही तृतीयपंथीना प्रवेश देत नसल्याचे सांगितले’, यावर मी अनेकवेळा मॉलमध्ये आल्याचे सांगितले. तरीही त्यांनी मला प्रवेश दिला नाही.Loading…


Loading…

Loading...