दारूच्या नशेत त्याने पत्नीचा कुऱ्हाडीने केला निर्घृण खून

mother,son,attack,sangali

पुणे : पतीनेच त्याच्या पत्नीचा दारूच्या नशेत कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना पुण्यातील महंमदवाडतील वाडकर मळा येथे मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. चारित्र्याच्या संशयावरुन हा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संगीता श्रीकांत चव्हाण (वय २६, रा़ वाडकर मळा, महंमदवाडी) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रीकांत कमाल चव्हाण असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता आणि श्रीकांत हे वाडकर मळा येथे लेबर कँपमध्ये झोपडे टाकून राहत होते. श्रीकांत हा संगीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत. दोघेही मजुरीचे काम करत होते. ते मुळचे कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात राहणारे आहे. रविवारी रात्री श्रीकांत दारू पिऊन आला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा श्रीकांतने संगीतावर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली व तो पळून गेला.

या घटनेची माहिती वानवडी पोलिसांनी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल भोसले व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. वानवडी पोलीस श्रीकांत चव्हाण यांचा शोध घेत आहेत.