भीमा-कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आठवले यांची मागणी

मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला.

तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईला २०० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने ऐतिहासिक विजस्तंभाला मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी आले होते. त्यावेळी सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली.