तुमची जनावरे ‘वर्षा’वर नेऊन बांधा – बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच एकमेव चांगले पाहुणे आहेत. शेतकऱ्यांनी वर्षा बंगल्यावर आपली जनावरे नेऊन बांधावीत. तिथे जनावरांच्या चारापाण्याची उत्तम सोय होईल, अशी टीका माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राम शिंदे यांच्यावर केली आहे. शुक्रवारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला चारा छावणीवर बोलताना दिला होता.

Rohan Deshmukh

शिंदे यांच्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटू लागले. थोरात म्हणाले, राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे. तरी सरकार अजून झोपेतून उठलेच नाही. अद्याप एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळात सरकारने जनतेला धीर देणे गरजेचे आहे. तातडीने पिण्याचे पाणी, चारा, रोजगार हमीची कामे दिली पाहिजेत. आता सर्वत्र दुष्काळ असल्याने कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. यावेळी एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे, तिथेच जनावरे नेऊन बांधा, असा घणाघात थोरात यांनी केला आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...