पत्नीचा खून करत स्वतः केली आत्महत्या, एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी!

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करून स्वतः भोकरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी (दि.११) उघड झाला. हि दुर्दैवी घटना घडल्यानंतर एकाच चितेवर पती-पत्नीला मुखाग्नी देण्यात आला. या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त होत असून एवढे टोकाचे पाऊल उचलण्याआधी आपल्या मागे लहान मुलांचा विचार करायला हवा होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, कायगाव येथील ज्ञानेश्वर विठ्ठल भोकरे (४०) याचे लग्न २००१ मध्ये जळगाव मेटे येथील गोरक्षनाथ सुस्ते यांची मुलगी वंदना हिच्या बरोबर झाला होता. त्यांना तीन मुली नंतर ३ वर्षापूर्वी मुलगा झाला होता.दरम्यान, ज्ञानेश्वर हा रागीट स्वभावाचा होता. तसेच तीन मुली झाल्याने तो पत्नीचा राग-राग करत होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला होता. ज्ञानेश्वर हा अल्पभूधारक होता.त्याने पत्नीच्या नावे कर्ज घेतले होते. त्यामुळेही त्यांच्यात सतत भांडण व्हायचे. १० मे रोजी रात्री पती-पत्नी झोपी गेले.

परंतु, रात्री कधी तरी ज्ञानेश्वरने पत्नी वंदना भोकरे(३५) हिचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः हा कायगाव शिवारातील नाल्या काठच्या भोकरीच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, वंदनाचा खुन केल्यानंतर तो कायगाव येथील उपसरपंच विश्वास दाभाडे यांच्या घरी सकाळी गेला होता. उपसरपंचांनी त्यांची समजूत घालून घडलेला प्रकार सदर महिलेच्या नातेवाईकांना त्यांनी ही माहिती दिली. यानंतर ज्ञानेश्वरने दाभाडे यांच्या मळ्यातील भोकरीच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

वंदना-ज्ञानेश्वर यांना सपना (१८), आरती (१४), रोहिणी (५) या तीन मुली व योगिराज (३) हा मुलगा अशी अपत्य आहेत. सपनाचा गत वर्षी वाकोद येथील लहाने कुटुंबात विवाह झाला आहे. सपना पतीच्या घरी वाकोद येथे सोबत छोटी बहीण आरती हिच्यासह होती. घरी फक्त पती-पत्नी, पाच वर्षाची रोहिणी व तीन वर्षाचा योगिराज घराबाहेर पत्रात झोपले होते. दरम्यान हि दुर्दैवी घटना घडल्यानंतर एकाच चितेवर पती-पत्नीला मुखाग्नी देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP