तो धावत आला आणि एकहाती नेत्रदिपक झेल घेतला; व्हिडीओ व्हायरल

लंडन : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे भारतातील आयपीएल स्पर्धा रद्द झाली आहे. मात्र या दरम्यान इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील नॉटिंघमशायर विरुद्ध डर्बीशायर संघांमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकन खेळाडू डेन पीटरसनने एक अविश्वसनीय झेल टिपला.

या सामन्यात डर्बीशायर संघाकडून सॅमुअल कॉर्नरस हा खेळाडू फलंदाजी करत होता. यावेळी गोलंदाजाने आखुड टप्प्याच्या चेंडू टाकला. या चेंडुवर सॅमुअल कार्नरसने शानदार फटका मारला. यावेळी हा चेंडु सहज सिमापार जाईल असे सर्वांनी गृहीत धरले होते. मात्र दक्षिण अफ्रिकन डेन पीटरसन हा चेंडुच्या दिशेने धावत सीमारेषेजवळ हवेत उडी मारत एका हाताने झेल घेत तसाच धावत सहकाराऱ्याकडे गेला.

या सामन्यात नॉटिंघमशायरने प्रथम फलंदाजी करत आपल्या पहिल्या डावात २६४ धावा केल्या. तर डर्बीशायरचा पहिला डाव प्रत्युत्तरात केवळ १९५ धावांवर आटोपला. यानंतर नॉटिंघमशायरने दुसऱ्या डावात ३१८ धावा केल्या. आणि सामन्यातील चौथ्या डावात डर्बीशायरला केवळ १५९ धावांवर रोखले. या प्रकारने नॉटिंघमशायरने ३१० धावांनी एक मोठा विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या