गुरुवारी सायंकाळी ३ तास राज्यातील केबल बंद ठेवणार – आमदार अनिल परब

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यभरातील केबल धारकांचा येत्या गुरुवारी सायंकाळचा वेळ हा काहीसा कांटाळवाणा जाणार आहे. कारण ट्रायने जाहीर केलेल्या ‘वाहिनिनुसार पैसे घेण्याचा’ विरोधात राज्यभरातील केबल व्यवसायिक गुरुवारी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राज्यातील केबल बंद ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार अनिल परब यांनी दिली.

आज ट्रायच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व केबल व्यवसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये निषेध म्हणून गुरुवारी सायंकाळी ३ तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्टार कंपनीच्या वाहिन्यांवर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचा इशारा देखील दिला. त्यासंदर्भातच स्टार कंपनीवर मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याचा निर्णय केबल ऑपरेटर अँन्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनने आजच्या बैठकीत घेतला आहे.