बढती मिळाली नाही म्हणून एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींची हत्या

टीम महाराष्ट्र देशा – बुधवारी सायंकाळपासून मुंबईतील कमला मिल परिसरातून गायब झालेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (३७) यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हत्याप्रकरणी सरफराज शेख या आरोपीला कोपरखैरणे येथील बोनकोडे भागातून अटक केली असून पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

बुधवारपासून बेपत्ता असलेल्या संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला आहे. कल्याणमधील हाजी मलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे.

एचडीएफसी बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या ३७व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून सहकाऱ्यानेच सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

You might also like
Comments
Loading...