fbpx

कर्नाटक सरकारची शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गुरुवारी विधानसभेत काँग्रेस-जेडी (एस)युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाखांचं कर्ज माफ करण्यात आलंय. यामध्ये 34 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसनं जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आज करण्यात आलीये. तसेच या अर्थसंकल्पात बेळगावात नवीन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे.

भाजपने आमचे १० आमदार फोडले तर आम्ही त्यांचे २० आमदार फोडू : कुमारस्वामी

सिडको घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – विखे पाटील

2 Comments

Click here to post a comment