fbpx

कुमारस्वामी आज सिद्ध करणार बहुमत

बंगळुरू : भाजप नेते येडियुरप्पा यांनी 19 मे रोजी बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे कॉंग्रेसने जेडीएसला पाठींबा देत बहुमताचा दावा केला होता.

अखेर जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी २३ मे रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा सुरवातीला फेटाळून लावणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान आज जेडीएस आणि कॉंग्रेस याचं आघाडी सरकार कर्नाटकात बहुमत सिद्ध करणार आहे.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण हे कुमारस्वामी यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. 222 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपाचे 104 व जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 आमदार आहेत. विधानसभेचे कामकाज आज दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार असून, दुपारी 2 वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.