तरंगत्या हॉटेलला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली

मुंबई – मरिन ड्राईव्हजवळील समुद्रात प्रस्तावित तरंगत्या हॉटेलला उच्च न्यायालयाने आज परवानगी नाकारली. हेरिटेज समितीनेही या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. त्याच धर्तीवर मुंबईच्या सागरी किना-याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मतही न्यायालयाने नोंदवले.

मरिन ड्राईव्हच्या ज्या भागात संबंधित हॉटेलचा प्रस्ताव आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. या बरोबरच नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाने देखील सुरक्षेचे कारण समोर ठेवले आहे. त्याचाही उल्लेख न्यायालयाने या वेळी केला.