डीएसकेंच्या मुलाच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

dsk

मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा मुलगा व डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे संचालक शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

शिरीष कुलकर्णी यांनी पुण्याच्या सत्र न्यायालयात न जाता थेट उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर प्रथम सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. दरम्यान डीएसके यांना २ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या मालमत्तेची यादी न्यायालयात सादर करण्याचे आदेश मागील सुनावणीत देण्यात दिले आहेत. या बरोबरच ५ फेब्रुवारीपर्यंत ५० कोटी रुपये जमा करण्यासही सांगितले आहे.