महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; साताऱ्यात ३ तर राज्यात ७ जणांचा वीज कोसळून मृत्यू

avkali paus

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. हवामान खात्यानेही याबाबत अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे राज्यातील कानाकोपऱ्यात पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. या पावसाने शेतकऱ्यांची मात्र काळजी वाढवलीय. कुठं कांदा भिजलाय, तर कुठं हळदीचं पिक वाया गेलंय. शेतकऱ्यांच्या शेतात काढणीला आलेल्या उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग, सोयाबीन या पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही ठिकाणी वादळी पावसात वीज कोसळून शेतकरी महिलेचा मृत्यूही झालाय. एकूणच या पावसाने शेतकऱ्यांपुढील आव्हानं वाढवली आहेत

रविवारी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसात खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन ठिकाणी वीज पडन मंदिर आणि घराचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी झालेल्या पावसामुळे लोकांची एकच त्रेधातिरपट उडाली. खंडाळा आणि माण तालुक्यात एका महिलेसह तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान, रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात राज्यात ७ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर ५ जनावरेही दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या