‘त्या’ पक्षाच्या उमेदवाराला नानांनी खरचं पाठींबा दिला आहे का?

Nana-Patekar

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीसाठी यंदा ऑनलाईन प्रचार देखील जोमात असल्याचे दिसत आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक अनेक मेसेजेस आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत अनेक जण उमेदवारांना प्रचारासाठी मदत करताना दिसत आहे.

अशातच आता मराठी अभिनेता नाना पाटेकर सुद्धा या राजकारणाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावाने अनेक मेसेज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. यात नाना एका अमुक पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन देत आहे. असा मेसेज व्हायरल होत आहे.

खुद्द नानांनीच यासंदर्भात ट्विट करुन स्प्ष्टीकरण दिले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसून कोणत्याही उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केला नसल्याचे म्हटले आहे. नाना आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आम्ही गावोगावी नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. अशा फोटोंचा काही मंडळी गैरवापर करीत आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला नाही.

सध्या नानांच्या नावाने अनेक फोटो व्हायरल होत असून त्यांनी यामध्ये अमूक एका पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन दिले आहे अशा आशयाचा मजकूर असतो. पण खुद्द नानांनीच ट्विट करुन या फोटोंमागील सत्य सांगितले आहे.