मुंबई : मृणाल ठाकूरने नुकताच इंस्टाग्रामवर बिकिनीमधला एक हटके फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे अभिनेत्रीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. मृणालने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या हृदयात तिची खास जागा निर्माण केली आहे. २०१८ मध्ये ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मृणाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिने बिकिनीमध्ये पोज देतानाचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.
फोटोमध्ये मृणालने गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे. त्यामध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे. पण सोशल मीडियावर अनेकांना तिचा लूक आवडला नाही. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले की, कपडे चोरीला गेले आहेत का?’ तर तिथे दुसऱ्याने लिहिले, ‘बॉलीवूडमधील प्रवेशाचा प्रभाव’. अशा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
एक मुलाखतीमध्ये मृणाल म्हणाली, जेव्हा लोक माझ्या फिगरला मटका म्हणतात तेव्हा मला काही फरक पडत नाही. मला खूप अभिमान वाटतो. ‘ती पुढे म्हणाली, ‘आता मला फोटो पोस्ट करण्याचा आत्मविश्वास आहे’. दरम्यान, मृणालचे बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<