कर्नाटकमधील सरकार पाडू नका,भाजपश्रेष्टींचा आदेश

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमधील जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा सातत्याने आरोप कॉंग्रेसकडून केले जात आहेत. मात्र कर्नाटकमधील सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न करू नका, अशा स्पष्ट सूचना आम्हाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून मिळाल्या आहेत, असे भाजपनेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी स्पष्ट केले.

येडियुरप्पा म्हणाले, मी नुकताच दिल्लीतून परतलो आहे. आमच्या नेत्यांनी मला स्पष्टपणे सांगितले आहे की कर्नाटकमधील सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. त्यामुळे तूर्त आम्ही शांत राहण्याचे ठरविले आहे. पण काँग्रेस आणि जनता दल एकमेकांशी भांडत असल्यामुळे काहीही घडू शकते. आम्हाला मात्र सरकार अस्थिर होईल किंवा पडेल, असे काहीही न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.