एमआयएमच्या खासदारासाठी भवानी मातेसमोर हवन

औरंगाबाद : राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान राज्यभरातील अनेक नेत्यांना कोरोनाने विळखा घातला आहे. औरंगाबादचे एमआयएमचे पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, जलील यांची प्रकृती उत्तम राहावी आणि ते कोरोनातून लवकर मुक्त व्हावे याकरिता यवतमाळच्या पुसद येथे एमआयएम पदाधिकाऱ्याने हवन पूजा केली. कृष्णा जाधव असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते एमआयएमचे युवक मराठवाड़ा उपाध्यक्ष आहेत. खा.इम्तियाज यांच्यासाठी कृष्णा यांनी पूसद ते निंबी हे साधारण पाच किलोमीटरचे अंतर पायी चालले. निंबी येथील भवानी टेकडीवर त्यांनी हवन पूजाही केली. जलील यांची तब्येत ठीक राहावी म्हणून त्यांनी देवीला साकडे घातले.

गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट आल्यानंतर जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ‘सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतःला आयसोलेट केले होते. सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित रहा’.

महत्त्वाच्या बातम्या